फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो,
मात्र व्यक्तीचा चांगुलपणा
प्रत्येक दिशेला पसरतो.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत
कठीण काळात
सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही
शुभ सकाळ
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद
निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच
कमी होऊ देत नाही
शुभ सकाळ
माझा अनुभव हाच सांगतो कि
नेहमी शांतता चांगली कारण
नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात
आपली बायको सुंदर आणि हुशार
असावी असं सगळ्यांना वाटते पण
दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे
पैज लावायची तर स्वत: सोबतच
लावा कारण जिकंलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल..
आणि हरलात तर स्वत:चाच
अहंकार हराल..
जिंकण्याची मजा तेव्हाच येते..
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..